रायगड1अगस्त26*माथेरान घाटात मोठा अनर्थ टळला! रायगड पोलिसांच्या दूरदृष्टीमुळे वाचले अनेकांचे प्राण
रायगडहून पूनम भारती, यूपीआजतक.
रायगड*माथेरान घाटात सोमवारी झालेल्या अपघातात एक मोठा अनर्थ टळला. रायगड पोलिसांनी वेळेआधी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे संभाव्य जीवितहानी टळल्याची घटना समोर आली आहे.
माथेरान घाटातील संबंधित धोकादायक वळणावर यापूर्वी कोणतीही संरक्षण भिंत नव्हती. रायगड पोलिसांनी या ठिकाणाचे सर्वेक्षण करून भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधित विभागाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर येथे संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले.
सोमवारी झालेल्या अपघातात एक कार थेट या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली आणि तेथेच अडकली. त्यामुळे वाहन खोल दरीत कोसळण्यापासून वाचले. ही संरक्षण भिंत नसती तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती.
रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे, दूरदृष्टीमुळे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे एक मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.
कॅमेरामनसह पूनम भारती, यूपीआजतक, रायगड.
#Matheran #RaigadPolice #MaharashtraPolice #Raigad #RoadSafety #BreakingNews #UPAajTak #Maharashtra #Accident #SafetyFirst
More Stories
हरिद्वार 16 सितंबर 26*53 साल बनाम 8 महीने — हरिद्वार में विकास की दो तस्वीरें सामने हैं
पूर्णिया बिहार 16 सितंबर26 *जेल में उगेगा रोजगार: पूर्णिया सेंट्रल जेल में मशरूम प्रशिक्षण का आगाज़*
पूर्णिया 16 सितंबर 26*यूपीआजतक न्यूज चैनल पर पूर्णिया किया कुछ महत्वपूर्ण खबरें