रायगड1अगस्त26*अलिबाग-रायगडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचा जनजागृती उपक्रम; मच्छीमारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
रायगडहून पूनम भारती, यूपीआजतक.
रायगड*भारतीय तटरक्षक दलाने अलिबाग आणि रायगड येथे समुदाय संवाद कार्यक्रम (Community Interaction Programme) तसेच मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमात सुमारे १८० मच्छीमारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल (IPS), महाराष्ट्र शासनाचे मत्स्य व्यवसाय विभागाचे उपआयुक्त श्री नागनाथ भडुले, मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान किनारी सुरक्षा, समुद्रातील सुरक्षितता, आपत्कालीन SAR हेल्पलाइन १५५४ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करताना घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवावी आणि सुरक्षित नौकानयनाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.
भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करत, “Safety at Sea” हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवला.
कॅमेरामनसह पूनम भारती, यूपीआजतक, रायगड.

More Stories
लखनऊ1अगस्त26*यूपी वालों के लिए बड़ी खबर! 1 अगस्त से बदल जाएगा आपकी गाड़ी की RC का सिस्टम*
रायगड1अगस्त26*उत्कृष्ट सेवेला सलाम! रायगड पोलिस व होमगार्ड जवानांचा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते गौरव
रायगड1अगस्त26*माथेरान घाटात मोठा अनर्थ टळला! रायगड पोलिसांच्या दूरदृष्टीमुळे वाचले अनेकांचे प्राण