August 11, 2026

UPAAJTAK

TEZ KHABAR, AAP KI KHABAR

रायगड11अगस्त2026*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर मनसे आक्रमक; खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी

रायगड11अगस्त2026*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर मनसे आक्रमक; खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी

रायगड11अगस्त2026*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर मनसे आक्रमक; खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी

रायगड से पूनम भारती, यूपीआजतक
नमस्कार, आपण पाहत आहात यूपीआजतक.

रायगड*रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज गणपत पार्टे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत महामार्गाच्या रखडलेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करावी आणि त्यांच्या जागी सक्षम व जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पूल, नागोठणे पूल, लोणेरे पूल तसेच सर्व्हिस रोडची दुरवस्था झाल्याचा दावा मनसेने केला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालक आणि कोकणवासीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच माणगाव बायपासचे काम पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे.

विशेष म्हणजे, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही खारपाडा टोलनाका सुरू करून टोलवसुली केली जात असल्याचा आक्षेप मनसेने घेतला आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोलनाका बंद करावा आणि काम पूर्ण होण्यापूर्वी अन्य कोणतेही टोलनाके सुरू करू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय महामार्गावरील दिशादर्शक आणि माहिती फलकांवर मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही मनसेने केली आहे.

या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज गणपत पार्टे यांनी दिला आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

रायगड से पूनम भारती, यूपीआजतक.
हॅशटॅग:
#रायगड #मुंबईगोवाहामार्ग #मनसे #राजठाकरे #नितीनगडकरी #खारपाडाटोलनाका #माणगावबायपास #कोकण #महामार्ग #गणेशोत्सव #मराठी #MNS #MumbaiGoaHighway #UPAajTak #PoonamBharti

Taza Khabar