रायगड17अगस्त26*अंमली पदार्थांविरोधात जनजागृती अभियान; व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार
रायगड से पूनम भारती, यूपीआजतक
रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविरोधात जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. वडखळ-धरमतर रोडलगत असलेल्या JSW कंपनीच्या उदयम कॉलनी परिसरात नागरिकांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या जनजागृती अभियानात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावरही त्याचे गंभीर परिणाम होतात, याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.
यावेळी नागरिकांनीही व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सकारात्मक सहभाग घेण्याचा संकल्प केला.
जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजाकडे एक पाऊल—हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
रायगड से पूनम भारती, यूपीआजतक.
More Stories
महोबा 3 अक्टूबर 26*1894 में खुद का डाक टिकट जारी करने वाला ऐतिहासिक चरखारी डाकघर आज डिजिटल युग मे बदहाल,
लखनऊ 3 अक्टूबर 26*मरते दम तक राहुल गांधी का साथ नहीं छोड़ूंगा, आराधना मिश्रा को बधाई
मुजफ्फरनगर, 3 अक्टूबर 2026* चारों तहसीलों में संपूर्ण समाधान दिवस का आयोजन