May 17, 2024

UPAAJTAK

TEZ KHABAR, AAP KI KHABAR

मुम्बई29सितम्बर*जीविताला आ. लटके यांच्याकडून धोका:-डॉ राजन माकणीकर*

मुम्बई29सितम्बर*जीविताला आ. लटके यांच्याकडून धोका:-डॉ राजन माकणीकर*

(रमेश लटके झोपुयो योजनेत पात्र असल्याचा पुरावा सादर )
मुम्बई29सितम्बर*जीविताला आ. लटके यांच्याकडून धोका:-डॉ राजन माकणीकर*

*मुंबई दि (प्रतिनिधी) १६६ अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे सेना आमदार रमेश लटके यांच्या झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत प्रकल्पातील सदनिका पात्र झाल्याचा पुरावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे दिला आहे.*

हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्पात एमआयडीसी सोबत आकृती विकासकाने करार करून विकासकाम सुरू केले आहे.

याच प्रकल्पात विद्यमान आमदार रमेश लटके यांनी १९९० साली बनावट रेशन कार्ड च्या आधारे तत्कालीन अधिकाऱ्यांना आपल्या राजकीय बळाचा वापर करून सदनिका पात्र करवून घेतली असल्याचा आरोप विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

मतदारसंघात *आमदार साहेबांच्या कृतीचा निषेध* अश्या आशयाचे शेकडो बॅनर्स ही झळकावले होते मात्र अन्य पक्षाचे हजारो बॅनर्स लागलेले असतांना फक्त आमदार लटके यांनी बृहन्मुंबई महापालिका अधिकारी उमेश रामभाऊ शेट्टी यांना फिर्याद देन्यास भाग पाडले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे बहुतांश बॅनर काढून टाकले, शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीहून डॉ राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या वर वि.स्था.गु.क्र. १०८/२०२१ कलम ३.४ प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज कायद्याप्रमाणे गुम्हा नोंद करवून घेतला.

रिपब्लिकन आंबेडकर चळवळीचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयन्त केला असून आमदार रमेश लटके यांच्या पासून माकणीकर व गायकवाड परिवाराच्या आणि स्वतःच्या जीविताला धोका असल्याचे डॉ. माकणीकर यांनी पोलिसात जवाब नोंदवताना सांगितले आहे.

*तुम कल आंबेडकर से डरते थे आज भी आंबेडकर से डरते हो अबतो आंबेडकरवादी से डरने लगे हो,* अस म्हणत डॉ माकणीकर यांनी खुलासा केला की, आमच्यासारख्या स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्त्याला असे जात आणि धनदांडगे संपवण्याचा प्रयत्न करतात यामुळे विनयभंग, चोरी, बलात्कार, अपहार, फसवणूक, खंडणी आदी सारखे गंभीर खोटे गुन्हे नोंदविण्याची शक्यता नाकारता येत नसून या सर्व गोष्टीत आमदार रमेश लटके याचा प्रामुख्याने सहभाग असेल याची नोंद घ्यावी व पोलिस संरक्षन देण्यात यावे अशीही मागणी पोलिसांकडे त्यांच्याकडून करण्यात आहे.

About The Author

Taza Khabar

Copyright © All rights reserved. | Newsever by AF themes.