रायगड29जुलाई26*रायगड पोलिस दलावर शोककळा! कर्तव्यनिष्ठ श्वान ‘ऑस्कर’ला भावपूर्ण श्रद्धांजली
रायगड | प्रतिनिधी पूनम भारती | यूपी आजतक
रायगड पोलिस दलाने आज आपल्या अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सहकाऱ्याला कायमचा निरोप दिला. पोलिस श्वान पथकातील ‘ऑस्कर’ या श्वानाचे निधन झाले असून, संपूर्ण रायगड पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

गेल्या सात वर्षांच्या सेवाकाळात ऑस्करने १९४ गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्याच्या उत्कृष्ट कार्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली आणि रायगड पोलिस दलाची प्रतिष्ठा अधिक उंचावली.

कर्तव्यनिष्ठा, धैर्य, सतर्कता आणि सेवाभाव यांचे प्रतीक ठरलेला ‘ऑस्कर’ पोलिस दलासाठी केवळ एक श्वान नव्हता, तर विश्वासू सहकारी आणि खरा योद्धा होता.

रायगड पोलिस दलाने आपल्या या वीर सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण केली.

वीर योद्धा ‘ऑस्कर’ यास भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.
कॅमेरामनसह पूनम भारती, यूपी आजतक, रायगड.
#Hashtags
#RaigadPolice #Oscar #PoliceDog #K9Unit #Tribute #SaluteToHero #Raigad #MaharashtraPolice #UPAajTak #PoonamBharti #OmShanti

More Stories
मुजफ्फरनगर29जुलाई26*कांवड़ यात्रा को लेकर एटीएस उतरी मैदान में*
शामली29जुलाई26*कावड़ यात्रा मर अपने वाहनों पर साइलेंसर लगाकर चलें व तेजगति से अपने वाहन ना चलाएः यातायात प्रभारी निधि चौधरी*
रायगड29जुलाई26*रायगड पोलिसांची मोठी कारवाई! अलिबागमध्ये ₹4 कोटींचे अंबरग्रीस जप्त; एक आरोपी ताब्यात