November 21, 2024

UPAAJTAK

TEZ KHABAR, AAP KI KHABAR

महाराष्ट्र11दिसम्बर*सरपंचपदासाठी १३ उमेदवार, कोण मारणार मनसरचे मैदान?

महाराष्ट्र11दिसम्बर*सरपंचपदासाठी १३ उमेदवार, कोण मारणार मनसरचे मैदान?

महाराष्ट्र11दिसम्बर*सरपंचपदासाठी १३ उमेदवार, कोण मारणार मनसरचे मैदान?

काँग्रेस,भाजपा व महागठबंधन आघाडीत होणार सामना

 

 

रामटेक शहर प्रतिनिधी : –शिवसेना (शिंदे गटात) सहभागी झालेले आ. आशिष जयस्वाल यांच्या रामटेक मतदार संघातील मनसर ग्रामपंचायतची निवडणूक सरपंचपदाच्या १३ उमेदवारांमुळे चर्चेत आली आहे. तब्बल 2० वर्षांनंतर मनसर ग्रा. पं.चे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने दावेदारांची संख्याही वाढली. त्यामुळे योग्य सरपंचाची निवड करताना मनसरच्या ५९०५ मतदारांची परीक्षा होणार आहे. येथे सरपंचपदासाठी १३ उमेदवार असले तरी खरा सामना काँग्रेस, भाजपा व महागठब़ंधन आघाडीच्या उमेदवारात रंगणार, हे निश्चित.

मनसरमध्ये काँग्रेसचे जिल्हां
अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या मार्गदर्शनात कांग्रेस नेते उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी शिवसेना (शिंदे गट) व भाजपा पुढे आवाहन उभे केले आहे. त्यांच्या गटात शिवसेनेच्या माजी सरपंच सुरेश उर्फ अप्पाभाऊ गायकवाड़ माजी सरपंच योगेश्वरी चोखांद्रे, माजी सभापती अरुण बन्सोड व माजी जिल्हा परिषद सभापती आशा गायकवाडही सहभागी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची ताकद मिळाली आहे. येथे कॉग्रेस समर्थित पॅनेलचे मोहन भगत उमेदवार आहेत. मात्र येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्या कंचन धनोरे यांनीही बंड पुकारत उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

मनसर हे भाजपाचे माजी आमदार डी. एम, रेड्डी यांचे गाव आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे हेही मनसरला राहतात. त्यामुळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते नंदकिशोर चंदनखेडे यांना निवडणुकीत उतरविले आहे. रेड्डी यांचे नेतृत्वात तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे व इतर पदाधिकारी निवडणूक प्रचारात जोमाने उतरले आहेत.

शिवसेना (शिंदे गट) सुद्धा मनसर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी माजी सरपंच कैलास नरुले यांना मैदानात उतरविले आहे. मनसर ग्रामपंचायत यापूर्वीही शिवसेनेच्या ताब्यात होती. पण यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उदयसिंह यादव यांच्या सोबत आघाडीत गेल्याने शिवसेना (शिंदे गटाला) धक्का बसला. आहे.

मनसर ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने उमेदवार वाढले आहेत. यात गणेश नगरे, सलैश कावळे, दीपक सहारे, श्रीपाद भालेराव, संतोष भूषण, धर्मदीप कुमरे, संतोष बोरीकर, पराग जोशी, प्रदीप चोपकर हे इतर उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsever by AF themes.