रायगड1अगस्त26*उत्कृष्ट सेवेला सलाम! रायगड पोलिस व होमगार्ड जवानांचा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते गौरव
रायगडहून पूनम भारती, यूपीआजतक.
रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड जवानांच्या उत्कृष्ट सेवेला आज गौरविण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड येथे आयोजित कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल (IPS) यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे, पोलीस हवालदार वरसोलकर, पोलीस हवालदार देशमुख, तसेच होमगार्ड क्रमांक ४६३० भालचंद्र पाटील आणि ५०४४ अनिल राठोड यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
सागरी सुरक्षा बंदोबस्तादरम्यान उत्कृष्ट कर्तव्य बजावत जबाबदारीने सेवा बजावल्याबद्दल या अधिकारी व जवानांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असलेली बांधिलकी हीच पोलीस दलाची खरी ताकद असल्याचे सांगितले.
या सन्मानामुळे पोलीस व होमगार्ड दलातील अधिकारी आणि जवानांचा उत्साह अधिक वाढला असून, भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते याच समर्पणाने कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कॅमेरामनसह पूनम भारती, यूपीआजतक, रायगड.
#RaigadPolice #AlibagPolice #HomeGuard #AnchalDalalIPS #PoliceHonour #CoastalSecurity #MaharashtraPolice #Raigad #UPAajTak #PoonamBharti #PublicSafety
More Stories
नई दिल्ली 18 सितंबर 26* यूपीआजतक न्यूज चैनल पर सुबह की देश राज्यों से बड़ी खबरें*
लखनऊ 18 सितंबर 26*यूपीआजतक न्यूज चैनल पर सुबह 7.30 बजे की बड़ी खबरें………
नई दिल्ली 18 सितंबर 2026*यूपीआजतक न्यूज चैनल पर *आज का राशिफल*