मुम्बई21जनवरी*अनुसूचित जातींचा विकास हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
समाजाच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून त्याचा नियोजनबद्ध विनियोग व्हावा व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनीही व्यक्त केली होती.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. Dhananjay Munde जी यांची आज भेट घेऊन आमच्या या मागणीचा पुनरुच्चार केला व यासाठी स्वतंत्र कायदा करण्यावर भर दिला. या मागणीला प्रतिसाद देत मुंडेजी यांनी समाजकल्याण आयुक्तांना कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच आज झालेल्या बैठकीत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीबद्दलही चर्चा झाली. लवकरच स्मारकाच्या जागेवर जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन मा. मुंडे जी यांनी या वेळी दिले.
धारावी,हिंगोली येथे भव्य संविधान सभागृह,चेंबूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, धारावी येथे ऑटीझम सेंटर,वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, धारावी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारत आहोत. या सर्व प्रकल्पांना सहकार्य करण्याची हमी दिल्याबद्दल मुंडेजी यांचे मनापासून आभार.
More Stories
कानपुर नगर12अगस्त25*पूर्व विधायक प्रत्याशी रचना सिंह गौतम ने PDA पाठशाला लगाकर बच्चों को पढ़ाया
मिर्जापुर: 12अगस्त25 *एक महीने बाद भी लापता का कोई सुराग नहीं*
मिर्जापुर:12 अगस्त 25 *साइबर अपराध जागरूकता कार्यक्रम का आयोजन*